०६ मे दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
०६ मे दिनविशेष
०६ मे १५४२ रोजी सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
१६३२ रोजी शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
०६ मे १८१८ रोजी राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
०६ मे १८४० रोजी पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
०६ मे १८८९ रोजी पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले.
०६ मे १९४९ रोजी ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
०६ मे १९५४ रोजी रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
०६ मे १९८३ रोजी अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
०६ मे १९९४ रोजी इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडणाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
०६ मे १९९७ रोजी बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
०६ मे १९९९ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
०६ मे २००१ रोजी पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
०६ मे २००२ रोजी भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
०६ मे २०१५ रोजी सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका झाली.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇