all posters created by saurabh chaudhari and team techunger
३० एप्रिल दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
३० एप्रिल दिनविशेष
३० एप्रिल जन्म
३० एप्रिल १७७७ रोजी जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)
३० एप्रिल १८७० रोजी भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)
३० एप्रिल १९०९ रोजी माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८)
३० एप्रिल १९१० रोजी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९८३)
३० एप्रिल १९२१ रोजी जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)
३० एप्रिल १९२६ रोजी मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)
३० एप्रिल १९८७ रोजी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.
३० एप्रिल मृत्यू
३० एप्रिल १०३० रोजी तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर ९७१)
३० एप्रिल १८७८ रोजी साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली.
३० एप्रिल १९१३ रोजी व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. (जन्म : ७ नोव्हेंबर १८६८)
३० एप्रिल १९४५ रोजी जर्मनीचे नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. (जन्म: २० एप्रिल १८८९)
३० एप्रिल २००१ रोजी प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)
३० एप्रिल २००३ रोजी मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ – आष्टी, उस्मानाबाद)
३० एप्रिल २०१४ रोजी भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९१९)
३० एप्रिल इतिहास
३० एप्रिल १४९२ रोजी स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.
३० एप्रिल १६५७ रोजी शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.
३० एप्रिल १७८९ रोजी जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
३० एप्रिल १९३६ रोजी वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
३० एप्रिल १९७७ रोजी ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
३० एप्रिल १९८२ रोजी कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
३० एप्रिल १९९५ रोजी उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
३० एप्रिल १९९६ रोजी थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्घाटन झाले.
३० एप्रिल २००९ रोजी ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

1 टिप्पण्या
Awesome posts
उत्तर द्याहटवाPlease Comment Below 👇