१५ एप्रिल दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
१५ एप्रिल दिनविशेष
१५ एप्रिल जन्म
१५ एप्रिल १४५२ रोजी इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म. (मृत्यू : २ मे १५१९)
१५ एप्रिल १४६९ रोजी शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म. (मृत्यू : २२ सप्टेंबर १५३९)
१५ एप्रिल १७०७ रोजी स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म. (मृत्यू : १८ सप्टेंबर १७८३)
१५ एप्रिल १७४१ रोजी चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू : २२ फेब्रुवारी १८२७)
१५ एप्रिल १८९३ रोजी चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म. (मृत्यू : २१ डिसेंबर १९७९)
१५ एप्रिल १८९४ रोजी सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचा जन्म. (मृत्यू : ११ सप्टेंबर १९७१)
१५ एप्रिल १९०१ रोजी अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.
१५ एप्रिल १९१२ रोजी उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म. (मृत्यू : १३ जानेवारी १९९७)
१५ एप्रिल १९१२ रोजी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू : ८ जुलै १९९४)
१५ एप्रिल १९२२ रोजी गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म. (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)
१५ एप्रिल १९३२ रोजी कवी सुरेश भट यांचा जन्म. (मृत्यू : १४ मार्च २००३)
१५ एप्रिल १९६३ रोजी भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.
१५ एप्रिल मृत्यू
१५ एप्रिल १७९४ रोजी पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.
१५ एप्रिल १८६५ रोजी अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१५ एप्रिल १९१२ रोजी आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १८५०)
१५ एप्रिल १९१२ रोजी आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८७३)
१५ एप्रिल १९८० रोजी फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून १९०५)
१५ एप्रिल १९९० रोजी हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)
१५ एप्रिल १९९५ रोजी तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.
१५ एप्रिल १९९८ रोजी कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)
१५ एप्रिल २०१३ रोजी संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)
१५ एप्रिल इतिहास
१५ एप्रिल १६७३ रोजी मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
१५ एप्रिल १८९२ रोजी जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१५ एप्रिल १९१२ रोजी आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
१५ एप्रिल १९२३ रोजी मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
१५ एप्रिल १९४० रोजी दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१५ एप्रिल १९९७ रोजी मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇