all posters created by saurabh chaudhari and team techunger
३१ मार्च दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
३१ मार्च दिनविशेष
३१ मार्च १६६५ रोजी मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.
३१ मार्च १८६७ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
३१ मार्च १८८९ रोजी आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
३१ मार्च १९०१ रोजी पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
३१ मार्च १९६४ रोजी मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
३१ मार्च १९६६ रोजी रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
३१ मार्च १९७० रोजी १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
३१ मार्च २००१ रोजी सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
३१ मार्च जन्म
३१ मार्च १५०४ रोजी शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)
३१ मार्च १५१९ रोजी फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १५५९)
३१ मार्च १५९६ रोजी फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)
३१ मार्च १८४३ रोजी नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)
३१ मार्च १८७१ रोजी स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६०)
३१ मार्च १९०२ रोजी भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)
३१ मार्च १९३४ रोजी भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)
३१ मार्च मृत्यू
३१ मार्च १९१३ रोजी अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८३७)
३१ मार्च १९७२ रोजी अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
३१ मार्च १९७८ रोजी इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.(जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)
३१ मार्च २००० रोजी भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९०२)
३१ मार्च २००२ रोजी भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)
३१ मार्च २००४ रोजी अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
३१ मार्च २००४ रोजी कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇