मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Note : For all our sharechat, Instagram users in this application some features may not work. so please search techunger.com at google or in chrome Browser... thank you..
मकर संक्रांतीचा इतिहास आणि महत्त्व
मकर संक्रांत हा पूर्ण भारतात साजरा होणारा सण आहे. नाव फक्त वेगवेगळं असतं, गुजरात मध्ये उत्तरायण तर तामिळनाडूत पोंगल, बंगाल मध्ये पौष संक्रेटि तर कर्नाटकात सुग्गी हब्बा, महाराष्ट्र व हरियाणा मध्ये संक्रांत तर आसाम मध्ये भोगली बिहू. अशा विविध नावं असलेला सण मात्र एकचं आहे.
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर-संक्रांत म्हणतात तसेच या काळात सूर्य उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून या काळाला उत्तरायण देखील म्हणतात.
तमसो मा ज्योतिर्गमय/ तिमिरातुनी तेजाकडे/ अंधारातुन प्रकाशाकडे प्रयाण करण्याची प्रक्रिया या दिवशी सुरू होते. कारण या दिवसापासुन अंधार हळूहळू कमी होतो आणि दिवस मोठा होत जातो.
या उत्तरायणाच्या काळाला आपल्याकडे इतके पवित्र मानले जाते, की या काळात मरण यावे म्हणून बरेच लोकं प्रार्थना करत असतात. भीष्म पितामह याचे जिवंत उदाहरण आहेत.
या दिवशी तिळगुळ देण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात तर याचे विशेष महत्व आहे. आजच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देतात आणि म्हणतात- तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. यामागे एक विशिष्ट भाव आहे, जुने राग-द्वेष, मतभेद काढून टाकायचे असतात, भांडणे विसरायाची असतात. स्नेहाचे संबंध पुन्हा बांधायचे असतात. वास्तविक रित्या पाहिले तर थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळ हे पौष्टिक असतात म्हणून या सणाच्या माध्यमातून एकमेकांना ते देऊन प्रेम वाटले जाते.
संक्रांतीच्या दिवशी क्रांती करण्याची प्रेरणा मिळते. आपापल्या क्षेत्रात क्रांती(अमुलाग्र बदल) करून दाखवण्याची प्रेरणा आजच्या दिवशी मिळते.
या दिवशी पतंग उडवण्याची देखील प्रथा पूर्ण भारतभर पाळली जाते. त्यामागेही खूप मोठा अर्थ आहे. सर्वसाधारण पणे पतंग उडवण्यासाठी मोकळ्या ग्राउंड मध्ये, गच्चीवर जावे लागते, आणि त्यामाध्यमातून सुर्यस्नान घडते व व्हिटॅमिन-D मिळते. पतंग जशी उडवणाराच्या हातात आहे तोपर्यंतच स्थिर असते आणि त्यासोबत संबंध तुटला तर कुठेही आणि कशाही अवस्थेत पडते. हेच आपण देखील समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये राम/चैतन्य आहे तोपर्यंतच आपल्या जीवनाला महत्व आहे. म्हणून आपण त्या रामाला धरून राहिले पाहिजे.

लेख: तेजस रणबावळे | प्रकाशन: techunger
शेअर करा
शेअर करा
1 टिप्पण्या
Great makar Sankranti post
उत्तर द्याहटवाPlease Comment Below 👇