23 January Dinvishesh | २३ जानेवारी दिनविशेष
२३ जानेवारी दिनविशेष
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती
नेेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
शहाजी राजे भोसले पुण्यतिथी
छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक
सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म
👇
23 जानेवारी दिनविशेष
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती
🚩हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏
शहाजी राजे भोसले पुण्यतिथी
नेेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
VIDEO
23 जानेवारी 1565 विजयनगर साम्राज्याचा शेवट.
23 जानेवारी 1708 छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून
घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
23 जानेवारी 1849 डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या
महिला पदवीधर बनल्या.
23 जानेवारी 1932 प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती
अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.
23 जानेवारी 1943 दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी
त्रिपोली शहर जिंकले.
23 जानेवारी 1968 शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस.
प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.
23 जानेवारी 1973 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी
व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
23 जानेवारी 1997 मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला
परराष्ट्रमंत्री बनल्या.
23 जानेवारी 2002 वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन
अपहरण.
23 जानेवारी 1814 भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे
ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर
१८९३)
23 जानेवारी 1898 गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचा जन्म.
(मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)
23 जानेवारी 1915 उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज
यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९७२)
23 जानेवारी 1920 व्यासंगी लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म.
23 जानेवारी 1934 ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा
जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)
23 जानेवारी 1947 इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मेगावती
सुकार्नोपुत्री यांचा जन्म.
23 जानेवारी 1919 नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन.
(जन्म: २६ मे १८८५)
23 जानेवारी 1931 द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना
अॅना पाव्हलोव्हा यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)
23 जानेवारी 1959 शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर
यांचे निधन.
23 जानेवारी 1989 स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचे निधन. (जन्म: ११
मे १९०४)
23 जानेवारी 1992 भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ.
प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.
23 जानेवारी 2010 शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचे निधन. (जन्म: २
ऑक्टोबर १९२७)
23 January 2024 dinvishesh balasaheb thakare jayanti Status Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2024 Status free download in high quality
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇