लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी
२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी विषप्रयोग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
वि.स. खांडेकर जयंती
११ जानेवारी १८९८ - २ सप्टेंबर १९७६
वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
राहुल द्रविड जन्मदिन
११ जानेवारी १९७३
राहुल द्रविड हा माजी भारतीय खेळाडू आणि कर्णधार आहे. त्याला क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. मराठी कुटूंबात जन्म झालेल्या राहुलने, वयाच्या १२ व्या वर्षापासून क्रिकेट खेळावयास सुरवात केली. त्यानंतर त्याने १५-वर्षांखालील, १७-वर्षांखालील आणि १९-वर्षांखालील राज्यस्तरीय संघांचे प्रतिनिधीत्व केले. २००४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्याच आयसीसी पुरस्कार समारोहात, दरवर्षी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
११ जानेवारी इतिहास
भारतात वर्तमानापत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना ११ जानेवारी १९५५ मध्ये नेपानगर (मध्यप्रदेश) येथे स्थापन झाला.
११ जानेवारी १७८७ रोजी विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.
११ जानेवारी १९६६ रोजी गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
११ जानेवारी १९८० बुद्धिबळाच्या खेळात हा नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
११ जानेवारी १९७२ रोजी पूर्व पाकिस्तानचे बांगलादेश असे नामकरण करण्यात आले.
११ जानेवारी १९२२ रोजी मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇