All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
पराग अग्रवाल बनले ट्विटरचे नविन सीईओ
कोण आहे पराग अग्रवाल ?
ट्विटरच्या संचालक मंडळाकडून एकमताने भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची सीईओ पदावर निवड केली आली. पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीतून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये बीटेकची पदवी घेत शिक्षण पूर्ण केले. २०११ सालापासून पराग अग्रवाल ट्विटर मध्ये काम करत आहेत.
पराग अग्रवाल हे एका दशकापासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. सॉफ्वेअर इंजिनीअर म्हणून त्यांनी ट्विटरची नोकरी स्वीकारली. त्यानंतर ते २०१७मध्ये ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्त झाले. या काळात त्यांनी ट्विटरच्या तंत्रज्ञान विषयक धोरणात आमूलाग्र बदल करत मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून यूजर्सचा अनुभव अधिक समृद्ध केला. याचबरोबर उत्पन्नातही वाढ करण्यास मदत केली. यामुळे जॅक यांच्यानंतर अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली.
पराग अग्रवाल हे भारतीय असून त्यांनी आयआयटी मुंबईतून बीटेकचे पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पूर्ण केले. यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट रीसर्च, एटी अँड टी आणि याहू रीसर्च यांसारख्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर सन २०११मध्ये ते ट्विटरमध्ये रुजू झाले होते. नोव्हेंबर २०२१मध्ये त्यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. याआधी सोशल मीडियाच्या खुल्या आणि विकेंद्रीत प्रमाणांची निर्मिती करण्यासाठी ओपनसोर्स आर्किटेक्ट विकसित करणाऱ्या ट्विटरच्या 'प्रोजेक्ट ब्लूस्काय'ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. या यशस्वी कामगिरीनंतर त्यांनी यापदी नियुक्ती करण्यात आली.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇