१६ नोव्हेंबर दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
१६ नोव्हेंबर दिनविशेष
राष्ट्रीय पत्रकारिता दिन
National Press Day 16 November
१६ नोव्हेंबर जन्म-मृत्यू
विष्णू गणेश पिंगळे हे एक भारतीय क्रांतिकारक आणि गदर पक्षाचे सदस्य होते. विष्णु पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) या गावचे राहाणारे असून इ.स. १९१६ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती. ते गदरच्या कटातील भूमिकेसाठी लाहोर कटातील चाचणी नंतर १९१५ मध्ये फाशी घेतलेल्यांपैकी एक होता.
१६ नोव्हेंबर इतिहास
१६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची युनेस्को ही विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत.
१६ नोव्हेंबर २०१३ रोजी २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
१६ नोव्हेंबर १९३० स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
१६ नोव्हेंबर १८६८ लॅकियर आणि जान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
१६ नोव्हेंबर १९१५ लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇