all posters created by saurabh chaudhari and team techunger
१० ऑगस्ट दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना
१० ऑगस्ट दिनविशेष
१० ऑगस्ट जन्म-मृत्यू
Henry nestle

_१० ऑगस्ट, १८१४ - ७ जुलै, १८९०_ नेस्ले ही जर्मन-स्विस मिठाई आणि जगातील सर्वात मोठी खाद्य व पेय कंपनी आहे तिचे संस्थापक *हेन्री नेस्ले* यांचा आज जन्मदिन !
fulan devi

१० ऑगस्ट १९६३- २५ जुलै २००१
फूलन देवी
फूलन देवी ह्या "बँडिट क्वीन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक भारतीय डाकू आणि त्यानंतर झालेल्या संसद सदस्या होत्या.
कोण होत्या 'फुलन देवी' ?
काळ होता १९८० सालचा.... दहशतीचे दुसरे नाव फुलन देवी. का ? तर एका ओळीत उभे करून २२ उच्चवर्णीय लोकांना हिने गोळ्या घातल्या.
उत्तर प्रदेशच्या गोहरा गावात १० ऑगस्ट १९६३ रोजी जन्मलेली ही मुलगी होती फूलन देवी जन्मापासूनच जातीभेदाची शिकार झालेली ही मुलगी अकराव्या वर्षीच बालविवाहाची शिकार झाली. फूलन देवी चे लग्न एका वृद्ध पुरुषाशी तिच्या काकांद्वारे करून देण्यात आले त्याचे नाव होते पुट्टीलाल.
परंतु सासरच्या गैरवर्तनामुळे फुलन परत घरी आली आणि वडिलांसोबत काबाडकष्ट करू लागली. काही दिवसातच जेव्हा फुलन १५ वर्षांची होती तेव्हा गावातील काही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर फुलन न्यायासाठी घरोघर भटकत होती परंतु कुठेही न्याय न मिळाल्याने फुलनने शस्त्र हातात घेतले आणि एक डाकू बनली. परंतु संकटे अजून थांबले नव्हते....
यानंतर तिच्या गावावर काही दरोडेखोरांनी डाका टाकला. आणि फुलनला सोबत घेऊन गेले. तेथेही तिच्यावर अनेक वेळा दुष्कर्म झाले. आणि येथून फुलनचे आयुष्यच बदलून गेले, फुलनदेवी आणि विक्रम मल्लासाह यांनी मिळून दरोडेखोरांची वेगळी टोळी बनवली.
आणि तिच्यासोबत झालेल्या दुष्कर्मांचा बदला घेण्याचे ठरवले व 1981 मध्ये 22 उच्चवर्णीय लोकांना एका ओळीत उभे करून गोळ्या घातल्या. त्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि सरकारने फूलन देवी यांच्या अटकेचे आदेश दिले पण उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश पोलीस फूलन देवी ला पकडण्यात अपयशी ठरले.
काही दिवसांनी 1983 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फूलन देवी ला आत्मसमर्पण करण्यास सांगितले आणि ते तिने स्वीकारलेही. कारण काही दिवसांआधीच तिचा साथीदार विक्रम मल्लासाह हा पोलीस चकमकीत ठार झाला. परंतु फुलनने शरणागती पत्करण्यासाठी सरकारला अटी मान्य करण्यास सांगितले. यातली पहिली आठ होती की कुणालाही फाशीला देण्यात यावी व कोणाला नाही आठ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ नये आणि सरकारने या अटी मान्य केल्या.
यानंतर फूलन देवी ला अकरा वर्षे तुरुंगात राहावे लागले, तर १९९४ मध्ये समाजवादी सरकारने फुलनदेवी यांची तुरुंगातून सुटका केली आणि दोन वर्षानंतर याच फुलनला समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली आणि मिर्झापूर ची जागा जिंकली तिथून खासदार बनून मग दिल्ली गाठली.
वर्ष होते २००१ शेरसिंह राणा यांनी ३७ वर्षीय फूलन देवी यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ठार केले. त्याने हत्येनंतर दावा केला की ही हत्या १९८१ मध्ये उच्चवर्णीयांच्या हत्येचा सुड होता.
फुलनदेवी वर 'बॅडिट क्वीन' नावाचा चित्रपट बनवण्यात आला परंतु फुलनला यावर बरेच आक्षेप होते, परंतु यातील काही सीन वगळल्या मुळे चित्रपट प्रदर्शित झाला परंतु नंतर सरकारने या चित्रपटावर बंदी घातली.
१० ऑगस्ट इतिहास
भारतीय अणूऊर्जा आयोगाची स्थापना

१० ऑगस्ट १९४८ रोजी भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ.होमी भाभा याची नेमणूक झाली. अणु ऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, न्यानो तंत्रज्ञान विकसित करणे अशी अणुउर्जा आयोगाची उद्दिष्टे होती.

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇