शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
www.techunger.com
आपणास शिवराज्याभिषेक दिनाच्या
महाराज्यांच्या किर्ती एवढ्या
शिव शुभेच्छा !!
All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
शिवराज्याभिषेक
पाठवा शुभेच्छा तुमच्या नावासह !
शिव राज्याभिषेक सोहळा
शिव राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा
Quiz / प्रश्नमंजुषा
शिव राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा
राज्याभिषेक – महाराजांचा नाही तर रयतेचा.
६ जून १६७४, आजपासून जवळपास ३४७ वर्षापूर्वीची ही घटना. रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला. ३२ मण सोन्याच राजसिंहासन उभं राहील. जिकडे तिकडे जल्लोशाच वातावरण. संपूर्ण रायगड सजलेला, दूरदुरून बोलावलेल्या संत महंतांची मांदीयाळी, राजे महाराजे यांचे दूत, राजमाता जिजाऊ, आणी स्वराज्याचे सर्व सरदार, मावळे व रयत यांच्या उपस्थितीत काशीचे महान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवरायांना राज्याभिषेक झाला. शिवरायांची ख्याती देशविदेशात पोहोचणार असे सगळ्यांनाच वाटत होते. पण महाराजांची कीर्ती बेभान होती. त्यांची ख्याती राज्याभिषेकाआधीच देशविदेशात पोहोचली होती....लाल महालात केलेल्या हल्ल्यात तुर्कस्तानच्या शायिस्तेखानाची बोटे छाटून पराभव केला, लोणावळ्या जवळच्या खिंडीत कोंडून उझबेकीस्तानच्या (आजच्या रशियाच्या) कार्तलबखानचा पराभव केला, ज्यांच्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांचा अनेकदा पराभव तसेच डच, पोर्तुगीज अशा सर्वांचाच पराभव महाराजांनी केला होता. तेव्हाच महाराजांची किर्ती पूर्ण जगभर पसरली होती. त्यानंतर आग्र्यामध्ये झालेल्या कैदेतून सुखरूप सुटून स्वराज्यात पोहोचणे किंवा गनिमी काव्याचा वापर करून कमी सैन्य असूनही हजारो-लाखोंच्या फौजेचा पराभव करणारे महाराज. अशाप्रकारे जगातील सर्वोत्तम योद्ध्यांचा पराभव करणारे महाराज १७ व्या शतकातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेनापती होते. पण ह्या सर्वोत्तम योद्ध्यांचा पराभव करतांना महाराज एकटे नव्हते. स्वराज्याची रयत जी मावळे या नावाने ओळखली जाते असे कैक मावळे महाराजांच्या सदैव सोबत होते. राजांच्या एका शब्दावर लढायला आणी वेळ येताच मरायलाही मागेपुढे न पाहणारा प्रत्येक मावळा हा शिवरायांइतकाच शूर होता.
(१) घोडखिंडीत “राज तुम्ही गडावर पोहोचून तोफेचा आवाज येत नाही तोवर हा बाजी एकही गनिमाला पुढे येऊ देणार न्हाई”. अशी फक्त ग्वाहीच नाही तर शरीरावर रक्ताच्या चिंधड्या उडाल्या असताना सुध्दा तोफेचा आवाज होईपर्यंत शत्रूला थांबणारा व आपल्या रक्ताने खिंड पावन करणारे बाजी प्रभू देशपांडे हे सुध्या आंतरराष्ट्रीय योद्ध्या होते.
(२) ५०००० च्या फौजेला तोंड द्यायला १५०० मावळे घेऊन गेलेला आणी पन्हाळा सुखरूप जिंकून आणणारा कोंडाजी फर्जंद हा देखील आंतरराष्ट्रीय योद्धाच होता.
(३) मासाहेबांचा आणी राजांच्या एका इच्छेवर मुलाच लग्न थांबवणारा व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’ असं म्हणून मोहिमेवर जाणारा तानाजी त्यातलाच एक.
(४) बहादूर गडावर ३५००० च्या फौजेच्या तोंडातून एक कोटी नगद आणी अमाप खजिना उडविण्यासाठी फक्त ९००० मावळ्यांचा उपयोग करणारे हंबीरराव मोहिते हा पण त्यातलाच एक रत्न.
असे अनेकानेक रत्न या स्वराज्यात होते. ज्यांनी स्वराज्यासाठी, संस्कृतीच्या विचारांसाठी जीवन समर्पित केले. आणी याचाच परिणाम स्वराज्यावर आक्रमण करतांना शत्रू महाराजांपेक्षा या इनामदार व कर्तव्यनिष्ठ सरदारांना / मावळ्यांना घाबरत असत.
एवढं सगळं पाहिल्यावर वाटत की ६ जुन १६७४ रोजी झालेला राज्याभिषेक महाराजांचा होता कि मावळ्यांचा? कारण राज्याभिषेक हा रयतेच पोषण, रक्षण, सांभाळ करणाऱ्यांचा होतो. पण स्वराज्यात रक्षण तर महाराजांएवढच मावळेही रयतेची काळजी करत होते. आणी म्हणूनच कि काय राज्याभिषेकाच सिंहासन बनवतेवेळी महाराज जिजाऊंना म्हणाले “मासाहेब, सिंहासनच बनवायचं असेल तर इतके मोठे बनवा कि त्यावर आमच्या सगळ्या मावळ्यांना एकदाच बसता आले पाहिजे. अशाप्रकारे स्वतः महाराजांनी सुद्धा कधी स्वतःचा मोठेपणा केला नाही. ते शेवट पर्यंत सांगत राहिले कि हे राज्य रयतेचे आहे. इथला प्रत्येक व्यक्ती हा सिंहासनाचा अधिकारी आहे. प्रत्येक जण शिवाजी आहे. आणी त्याचाच पुरावा म्हणजे सिद्धी जौहरला भेटायला गेलेला शिवा काशीद. मग राज्य जर रयतेच असेल, प्रत्येक मावळ्याचे असेल, प्रत्येकाच्या परिश्रमाने जर आजचा दिवस दिसत असेल तर हा राज्याभिषेक स्वराज्याचं काम करणाऱ्या, स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा आहे असं महाराज सांगायचे. कारण राज्याभिषेक म्हणजे फक्त राजमुकुट नव्हता. राज्याभिषेक म्हणजे राज्यातीलं प्रत्येकाचा अभिषेक, राज्यातील प्रत्येक जण स्वतंत्रपणे, अभिमानाने जगेल अशी परिस्थिती निर्माण करणं होय. महाराजांनी फक्त राजमुकुट परिधान करून सिंहासनावरून आदेश नाही सोडले. महाराजांनी आधी रयत सुखी केली. राज्यातील प्रत्येकाचा अभिषेक आधी केला आणी नंतर क्रिकेट मधला कॅप्टन जसा मॅच जिंकल्यावर ट्रॉफी घ्यायला जातो त्याप्रमाणे राजमुकुट परिधान केला.
स्वराज्यातील मावळे जर नसते तर कदाचित महाराजांना ती संधी भेटलीही नसती त्यांची शक्ती वाया गेली असती. तसेच आजही नेतृत्व करणारे अनेक शिवाजी आपल्यात आहेत. गरज आहे ती फक्त आपण स्वतः तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी बनून त्यांच्या नेतृत्वाला चालना देण्याची व स्वराज्यनिर्मिती व रक्षणात हातभार लावण्याची. असे जर आपण करू शकलो तर ६ जून १६७४ च्या राज्याभिषेकाची पुनरावृत्ती झाल्याखेरीज राहणार नाही.
Article by Tejas Ranabawale | Publish by techunger.com
. SHARE
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇