All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
दिनविशेष
बुध्द पौर्णिमा
बुद्ध जयंती शुभेच्छा

बुद्धधर्माचे आद्य संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सनाच्या पूर्वी ५६० वर्षे अगोदर कपिलवस्तु शहराच्या लुम्बिनी नावाच्या बगिच्यात झाला. बुद्धांचे जीवन आणि विचार त्यासंबंधी विस्तृत व्यवस्थित अध्यायवार आणि खण्डश: वर्णन 'ललितविस्तर' नावाच्या ग्रंथात आढळून येते. विशिष्ट गुणांनी युक्त असलेल्या शाक्यवंशात राजा शुद्धोदनाची पत्नी मायादेवीच्या पोटी गौतम बुद्धांनी जन्म घेतला आणि बौद्ध धर्माची स्थापना केली.
गौतम बुध्दांना एक मुलगाही होता. परंतु ...संसाराबाबत विरक्ती प्राप्त झाल्याने, तसेच पुढे संस्कृतीचे करण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला आणि फिरतफिरत एका विशाल वृक्षाजवळ ते येऊन पोहोचले, तेथे ध्यानस्थ झाले आणि त्यांना दैवी ज्ञान प्राप्त झाले, तेव्हापासून ते 'बुद्ध" म्हटले गेले आणि मग त्यांनी बुद्धधर्माचा प्रचार केला.
संघं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
बुद्धं शरणं गच्छामि,
हे बुद्ध धर्माचे आधारसूत्र आहे.
बुद्धाचे तत्त्वज्ञान चार प्रकारचे होते.
(१) माध्यमिक
(२) सौत्रान्तिक
(३) वैभाषिक
(४) योगाचार.
बुध्दाच्या तत्त्वज्ञानाच्या तीन शाखा आहेत.
(१) क्षणिकं क्षणिकं
(२) विज्ञानं विज्ञानं
(३) शून्यं शून्यं.
बुध्दांनी संघनिष्ठा समजावली, संघाविना धर्म दुबळा होईल असे त्यांनी सांगितले. धर्म, संस्कृती, विचार टिकवायचा असेल तर संघ असावा. अन्यथा तुमचा धर्म, संस्कृती, विचार दुबळे बनतील आणि कोणीही तुम्हाला मारेल/तुमच्यावर आक्रमण करेल.
अनेक लोकांच्या मनात बुध्द अवतार आहे याबद्दल शंका आहे, त्यांच्या मते तो एका उन्नत अवस्थेला पोहोचलेला विकसित जीव होता. जन्मजन्मंतरापर्यंत प्रयत्न केल्यानंतर एक अवस्था प्राप्त होते आणि त्यालाच बुध्द म्हणतात, अशी त्यांची धारणा आहे. पण बुध्दाला अवतार मानण्यात कुठलीही शंका ठेऊ नये. कारण, 'यद्यद् विभूतिमत्सत्त्वम् श्रीमदुर्जितमेववा...(गीता अ.१०, श्लोक. ४१) यानुसार ज्याने विस्मृत लोकांना नवीन दृष्टी दिली, नवा मार्ग दाखवला, धर्मप्रचार करून मोठी चळवळ उभी केली, ज्याच्या शब्दाखातर आपल्या सर्वस्वाचा त्याग करून लोक प्रचारासाठी परक्या देशांत गेले आणि तेथे धर्म उभा केला, धर्मप्रचार व संघभावना विसरून गेलेल्यांना ज्याने मार्गदर्शन केले त्याला अवतार मानण्यात काहीही अतिशयोक्ती नाही.
बुद्धांवर काही आरोपही केले जातात.
१) बुध्द नास्तिक होते.
२) बुध्द तत्वनिष्ठ नव्हते.
३) बुध्द मांसाहारी धर्मप्रचारक होते.
४) बुध्द रूढी विरोधी होते.
पण विचार केला असता एका अवतारी पुरुषाला या गोष्टी शोभत नाहीत. त्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून केलेल्या त्या फक्त टीका असतात. तरी आपण सगळ्यांनी मिळून आपलं जीवन बुद्धां सारखं धर्माच्या,संस्कृतीच्या कामात येईल असे बनवण्याचा प्रयत्न करूया. तसेच बुध्दांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनात, समाजात, संघनिष्ठा निर्माण करूया. तरच खरी बुध्द पौर्णिमा साजरी होईल.
. SHARE
gautam buddha jayanti

Lord buddha quotes
buddha jayanti shubhechha marathi

बुध्द पौर्णिमा

buddha purnima wishes
lord buddha quotes

बुध्द पौर्णिमा

buddha full screen status

lord buddha jayanti status

बुध्द पौर्णिमा

xera tech buddha jayanti post

buddha speaks

gautama buddha quotes

भगवान बुद्ध

बुध्द पौर्णिमा

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇