चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात.
www.techunger.com
आपणास गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छा
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..
विद्या मिळो सरस्वतीकडून..
धन मिळो लक्ष्मीकडून..
प्रेम मिळो सगळ्यांकडून..
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असुद्या नेहमी हर्ष येणारा नवीन दिवस
रेल नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेछा
का साजरा केला जातो गुढीपाडवा ?
अधर्माचि अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी ।
सुखाची उभवीं ॥
- ज्ञानेश्वरी
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण गुढीपाडवा ! हा दिवस हिंदू नवं वर्ष म्हणून देखील साजरा करतात. शालिवाहन संवत्सराचा ...हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, सुवर्ण खरेदी तसेच व्यवसाय प्रारंभ इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारात, खिडकीत उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाचा प्रारंभ होतो.
गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी, काढीच्या वरच्या टोकाला स्वच्छ रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, आणि त्यानंतर तयार केलेली गुढी दारात, खिडकीत ,उंच गच्चीवर उभारण्यात येते. गुढीला गंध ,फुले ,अक्षता अर्पण करतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून सूर्यास्ता आधी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. काठीपूजन ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा-परंपरा आहे. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना (मित्र, नातेवाईक) नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी (Ugdi) अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
सांस्कृृतिक इतिहास
• ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.
• प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
• शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
• प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले.
पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ या नाटकांमध्ये आले आहेत.
शुभेच्छा संदेश
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श,
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी आरोग्याची
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. त्या मुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.
सूर्य संवेदना पुष्पे:, दीप्ति कारुण्यगंधने|
लब्ध्वा शुभम् नववर्षेअस्मिन् कुर्यात्सर्वस्य मंगलम् ||
ज्या प्रकारे सूर्य प्रकाश देतो, संवेदना करूणेला जन्म देते, फुल सदैव सुवासित राहते, त्याच प्रकारे या नवीन वर्षातील प्रत्येक दिवस आपल्यासाठी मंगलमय असो !
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने
साजरा करा पाडव्याचा सण !
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श,
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
1 टिप्पण्या
Khupach chaan
उत्तर द्याहटवाPlease Comment Below 👇