10 March Dinvishesh | १० मार्च दिनविशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
10 मार्च दिनविशेष*
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
*👇
All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
10 मार्च
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली जी भिडेवाडा येथे होती. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती महात्मा जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १० मार्च १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.फॉरवर्ड करा READ MORE
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
03-10, 10/03
mar, march, techunger, Saurabh Chaudhari, savitribai fule, savitribai phule, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यतिथी, सावित्रीबाई फुले सुविचार मराठी, marathi quotes, hindi quotes, motivational quotes, quotes, free status, status, whatsapp status, instagram posts, famous quotes, famous person quotes, techunger blogs, famous jayanti, shiv dinvishesh, daily banner, daily posts, daily status, on this day, famous birthdays today
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇