All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
१९ फेब्रुवारी
शिवजयंती साजरी करण्याआधी एकदा नक्की वाचा
शिवजयंती मनामनात|
शिवराय घराघरात ||
छत्रपती शिवाजी महाराज कि म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडून जय बाहेर येतं. महाराजांची किर्तीचं तेवढी बेभान होती. स्वराज्यातील प्रत्येकाची पहिली दिवाळी समजली जाणारी शिवजयंती प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण असतो. या निमित्ताने जसं दिवाळीला आकाशकंदील, नवीन कपडे, अशी खरेदी करतो तसचं शिवजयंतीला देखील भगवा कुर्ता, घरावर तसेच गाडीला भगवा झेंडा अशाप्रकारचं सुशोभन केलं जात.
लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र करण्यासाठी, समाजात ऐक्यभावना टिकवण्यासाठी सुरु केलेल्या शिवजयंतीने आज वेगळेच रूप धारण केले आहे. टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात करून प्रत्येकाच्या मनात शिवजयंती पोहोचवली होती. पण बऱ्याचदा भगव्याचा /महाराजांचा अपमान आपल्याकडून जाणते- अजाणतेपणाने होऊन जातो. सोशल मिडीयावर तर विचारूच नका. तिथे तर सरळ महाराजांच्या नावाचा /फोटोचा तसेच विचारांचा सर्र्रास गैरवापर होतांना दिसतो. त्यानंतर चौकाचौकात DJ वर महाराजांवरचे गाणे, पोवाडे, वाजवून साजरा करताना कधी कधी गोंधळही आमच्या कडून होऊन जातो हा विचारही करत नाही कि एकीकडे “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” असे नारे आम्ही देतो आणि दुसरी कडे काही जनांमुळे शिवजन्मोत्सवी गोंधळही घडून जातो? ही खूप मोठी शोकांतिका आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यावर असं वाटत कि आज जर महाराज असते तर मुघलांना मारण्याआधी आम्ह्यालाच मारलं असतं. रांझ्याच्या पाटलाच्या हात-पायांसोबतच आमचे विचार देखील कलम केले असते. कदापि स्वराज्याचा कारभार महाराष्ट्रापुरता देखील झाला असता की नाही याचा विचार करावा लागेल. शिवजयंती तसेच शिवाजी महाराज हा काय वर्षातून एकदा आठवणीचा विषय नाही, तर दैनंदिन जीवनात जगण्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराज, स्वराज्य, त्यातील मावळे, त्याचं शौर्य-पराक्रम, गनिमी कावा, महाराजांचं रयतेवरच प्रेम, या सगळ्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा वापर करणे हा खरा शिवजयंतीचा हेतू. पण आज ते सोडून सगळ होतंय.
शिवाजी महाराजांच रयतेवरच प्रेम, स्त्रीयांबद्दलचा आदर, वेळी शत्रूचा देखील सन्मान आणि मित्रांबद्दलची कठोर भूमिका, तसेच प्रत्येक परिस्थितीतील वेगवेगळी भूमिका या गोष्टी आचरणात येतील तेव्हाच शिवजयंती मनामनात साजरी झाली असे म्हणता येईल. प्रत्येकाच्या मनात महाराजांचा आदर्श, आणि त्यांचे विचार स्थिर होतील त्याच दिवशी शिवजयंती मनामनात साजरी झाली असे म्हणता येईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण स्वराज्यावरचं नाही तर दुश्मनांच्या ही मनावर राज्य करणारे राजे होते. त्याकाळातील आणि आजही प्रत्येक कुटुंबाची, आईवडिलांची इच्छा असते कि आमच्या पोटी शिवाजी सारखा पुत्र जन्माला यावा. पण जिजाबाई आणि शहाजी बनायला कोणी तयारच नाही. कारण त्यांना ठाऊक च नाही कि महाराजांच्या एवढ्या शौर्याचं मूळ जिजाबाई आणि शहाजीराजे होते. प्रत्येक आई वडिलांनी जर जिजाऊ आणि शहाजी बनण्याचा प्रयत्न केला तर घराघरात शिवाजी जन्माला येतील. कारण शिवाजी हे फक्त नाव नाही तर ते एक चारित्र्य आहे. संस्कार, नैतिक मुल्ये, तत्त्वज्ञान या सर्वांच एकत्रीकरण त्यात आहे. प्रत्येक मुलाला जर त्याच्या बालपणापासूच महाराजांप्रमाणे या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर घराघरातून शिवराय तयार व्हायला वेळ लागणार नाही. शिवराय जर घराघरात तयार झाले तर मुघलवादी समाज नष्ट होण्यास वेळ लागणार नाही व नैतिक तसेच धर्मनिरपेक्ष आणी सांस्कृतिक प्रजा निर्माण होईल.
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात हे वाक्य आपल्याला या काळात सोशल मिडीया तसेच इतरही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला दिसते. पण आता ते वाक्य बदलण्याची वेळ आली आहे असं वाटतंय. शिवजयंती मनामनात शिवराय घराघरात ही ओळ खरी करायची असेल तर आपल्या सगळ्यांना स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. गाडीला झेंडा, DP ला फोटो आणि चौकाचौकात पैशांचा गैरवापर करणारा गोंधळ न करता खऱ्या अर्थाने महाराजांना समजुन घेतले आणि तसं जगण्याचा प्रयत्न केला, महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग समजून घेऊन त्यातुन जीवन जगण्याचा धडा घेतला आणि तसं जगण्याचा प्रयत्न केला तरच शिवजयंती मनामनात आणि शिवराय घराघरात निर्माण होतील. महाराजांनाही आनंद होईल. तरी आपण सगळे मिळून आजपासून शिवजयंती चौकाचौकातच नाही तर् मनामनात साजरी करण्याचा प्रयत्न करूया आणि प्रत्येक घरात शिवाजी तयार करण्यासाठी प्रयत्नशील बनूया
|| जय शिवराय ||
written by: Tejas Ranabawale| publish by: TecHunger
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇