२४ फेब्रुवारी दिनविशेष
छत्रपती राजाराम राजे भोसले जयंती

मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती पहिले राजारामराजे भोसले यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर झाला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला.
जयललिता जयरामन जन्म

अम्मा या नावाने सुप्रसिध्द जयललिता जयरामन यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी झाला, या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केला होता.
श्रीदेवी स्मृतिदिन

सुप्रसिध्द भारतीय चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज स्मृतिदिन. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले.
स्टीव्ह जॉब्स जन्मदिन

अमेरिकन व्यवसायिक आणि ॲपल कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ रोजी झाला.
वेडात मराठे वीर दौडले सात

कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना *सेनापती प्रतापराव गुजर* व त्यांचे *६ सहकारी* मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच *कवीश्रेष्ठ* कुसुमाग्रजांनी *वेडात मराठे वीर दौडले सात* हे काव्य लिहिले आहे.
24 फेब्रुवारी 1670
मराठा
साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म.
(मृत्यू:
२ मार्च १७००)
24 फेब्रुवारी 1924
पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे
बादशहा तलत महमूद यांचा जन्म.
(मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)
24 फेब्रुवारी 1938
नायके
इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.
24 फेब्रुवारी 1939
चित्रपट
कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म.
(मृत्यू: ९ मार्च २०१२)
24 फेब्रुवारी 1942
भारतीय
तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.
24 फेब्रुवारी 1948
राजकारणी
आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म.
(मृत्यू: ५ डिसेंबर
२०१६)
24 फेब्रुवारी 1955
अॅपल
कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक ज यांचा जन्म.
(मृत्यू: ५ ऑक्टोबर
२०११)
24 फेब्रुवारी 1674
कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत
बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी
मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर
दौडले सात हे काव्य लिहिले आहे.
24 फेब्रुवारी 1810
हायड्रोजन
आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्री कॅव्हँडिश
यांचे निधन.
(जन्म: १० ऑक्टोबर १७३१)
24 फेब्रुवारी 1815
अमेरिकन
अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन.
(जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ –
लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)
24 फेब्रुवारी 1936मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
24 फेब्रुवारी 1975
सोविएत
युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन.
(जन्म: ३० ऑगस्ट १८९५)
24 फेब्रुवारी 1986
भरतनाट्यम
नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन.
(जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)
24 फेब्रुवारी 1998
अभिनेत्री
व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन.
(जन्म: १८ एप्रिल १९१६)
24 फेब्रुवारी 2011
अमर चित्र
कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन.
(जन्म: १७ सप्टेंबर १९२९)
24 फेब्रुवारी 1822जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
24 फेब्रुवारी 1918इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
24 फेब्रुवारी 1920नाझी पार्टीची स्थापना झाली.
24 फेब्रुवारी 1938ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
24 फेब्रुवारी 1942व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
24 फेब्रुवारी 1952कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
24 फेब्रुवारी 1961मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
24 फेब्रुवारी 1987इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.
24 फेब्रुवारी 2008फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
24 फेब्रुवारी 2010
एक दिवसीय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू
बनला.
02-24, 24/02

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇