14 फेब्रुवारी
पुलवामा हल्लातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली
मी स्वर्गवासी वीर जवान
ओळखलत का मला? मी तोच जो
पुलवामाच्या कारस्थानाचा शिकार झालो,
फरक एवढाच आज शिकारी शुर वाघ नव्हता
बिळातला उंदीर जरा डोकावला होता ||१||
...
१४फेब्रुवारीला कुणी मायबापात, कुणी प्रेमात गुंग
रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या थारोळ्यात माझं अंग,
पुलवामा बनला स्वर्ग, धरती बनली स्वर्गनगरी
शत्रुने पाठीवर वार केला, यात कसली हुशारी? ||२||
कुणाची राखी तुटली, कुणाचे कुंकु पुसले
तिरंग्यात लपेटल्याने सारे घरदार मात्र रुसले,
प्रेम,माया,मित्रत्व तर कधीच नाही जमले
शत्रुही बरोबरीचा हवा, तुम्ही त्यातही नाही बसले ||३||
त्यादिवशी ठरवलं,
आम्ही तुम्हाला मारणार, जरुर मारणार
पण,बंदुक,गोळी अन वेळ आमची
फक्त घायाळ धरती ति तुमची असणार ||४||
आज, आम्ही पाठीमागुन नाही, घरात घुसून मारतो
लपुन वार करत नाही कारण, बाप हा बाप असतो
भारताचा दिवाळी दसरा नेहमी झळकतो
नादाला लागु नका, आम्ही होळीही करतो ||५||
अभ्यास भूदलाचा,पेपर हवाईदलाचा
काय दशा रे पाकिस्तानची,
ऐकुन धन्य झाली ही मातृभूमी
जी आई त्या भारतीय जवानाची,
जी आई त्या शहीद जवानाची...||६||
written by: Tanuja Baliram kaklij | publish by: TecHunger
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇