All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
२६ जानेवारी
आज २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन
आणि त्याच निमित्त team TecHunger घेऊन आले आहेत
प्रजासत्ताक दिन विशेष लेख
प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन
२६ जानेवारी १९५० भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झालं. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. या दिवशी संपुर्ण देशभरात तिरंग्याचे आरोहण होऊन त्याला मानवंदना देऊन भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणं आयोजित केले जातात. राष्ट्र प्रजासत्ताक झालं म्हणजे आजपासून राष्ट्रात जनतेची सत्ता चालणार. मग प्रजासत्ताक/जनतेची सत्ता म्हणजे तरी काय ?
प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजे ज्या राष्ट्राचे सर्व निर्णय जनतेच्या मताने, जनतेच्या हिताचे, तसेच जनतेच्या निर्णयातुन राष्ट्राचे हिताचे असतात, अशा राष्ट्राला प्रजासात्ताक राष्ट्र म्हणतात. ज्या राष्ट्रातील तरुणांचा आशावाद अमर आहे, त्त्या राष्ट्रास प्रजासत्ताक राष्ट्र म्हणतात. प्रजासत्ताक राष्ट्रातील लोकांची विचारपद्धती, आचारपद्धती, जीवनपद्धती, एक असते. अशादृष्टीने पाहिलं तर १९४७ च्या आधी देखील भारत प्रजासत्ताकच होता. कारण त्याकाळातही भारतात होणाऱ्या सर्व गोष्टींचे निर्णय जनतेने एकत्र येऊनच घेतले जात होते. फक्त या दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आले. त्यानंतर मात्र सगळे निर्णय घेण्याचे सगळे अधिकार एका विशिष्ट गटाला मिळत गेले. विशेष म्हणजे ह्या गटाची निवड करण्याची जबाबदारी या दिवसापासून पूर्णपणे जनतेवर आली, आणी या दिवसापासून दर पाच वर्षांनी आपल्याला प्रजासत्ताक राष्ट्रात राहत असल्याची अनुभूती येते.
प्रजासत्ताक होऊन इतके वर्ष लोटले तरी देखील या देशाच्या समस्या काही संपल्या नाहीत. गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार या समस्या जेवढ्या प्रमाणात स्वातंत्र्याच्या आधी होत्या तेवढ्याच प्रमाणात आजही आहेत. जनतेचे प्रतिनिधी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्नही करत आहेत. पण म्हणतात ना कि एकीचे बळ तसं सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जर या समस्यांशी सामना केला तरच शक्य आहे. नाहीतर वर्षानुवर्षे ह्या समस्या तशाच राहतील. त्यासाठी गरज आहे ती सगळ्यांनी मिळून लढा देण्याची. ज्याप्रकारे Covid-19 विरोधात आपण एकत्र येऊन लढा दिला आणी संपूर्ण जगात प्रथम आलो. ऑस्ट्रेलिया सारख्या क्रिकेटच्या बलाढ्य देशाच संघभावनेच्या बळावर गर्वहरण केल आणी इतिहास रचला. या गोष्टींची जगाने देखील नोंद घेतली. यासाठी जसा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढा दिला. तसाच लढा या समस्या सोडवण्यासाठी देखील देण्याची गरज आहे.
त्याची पहिली पायरी म्हणजे स्वभाषा, स्वदेश आणी स्वधर्म याचं आचरण. आपल्या मातृभाषेचा आणी राष्ट्रभाषेचा आदर आणी दैनंदिन जीवनात वापर. स्वदेशाबद्दल ममत्व, आपुलकी, अस्मिता असावी, आईकडून जर आपल्या अपेक्षित फायदा होत नसेल तर जसे आपण शेजारच्या बाईला आई म्हणत नाही तसेच स्वदेशासोबत देखील आई आणी पुत्राचा संबंध असावा. त्यानंतर स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: याप्रमाणे प्रत्येकाने देशाप्रती एक सुजाण नागरिकाचा धर्म पार पाडावा.
देशातील प्रत्येक गोष्टीत, घटनेत दुसऱ्याला जबाबदार न ठरवता प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी. जेव्हा प्रत्येक नागरिक देशाप्रती स्वत:पासून सुरुवात करेल आणी प्रत्येक गोष्टीसाठी स्वत:ला जबाबदार ठरवेल किंवा देशाच्या विकासासाठी स्वत;पासून सुरुवात करेल तेव्हाच देश प्रजासत्ताक झाला असे म्हणता येईल.
आपण सगळे भारत देशाला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अमर ठेवण्यासाठी लागणारी शक्ती, ताकद, हिंमत भारत मातेकडे मागुया.
जय हिंद
लेख: तेजस रणबावळे | प्रकाशक : Techunger
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇