नानासाहेब पेशवे जन्मदिन
बालाजी बाजीराव यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी झाला. त्यांना नाना साहेब पेशवे म्हणून देखील ओळखले जाते. ते मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते. त्याच्या कारकिर्दीत , मराठा साम्राज्य शिगेला पोहोचले बालाजी बाजीराव, १७४० मध्ये वडील पहिला बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर छत्रपती शाहूंनी त्यांना पेशवे म्हणून नियुक्त केले. आणि ते चित्पावन ब्राह्मण कुळातील तिसरे पेशवे होते, १७४० मध्ये वडील बाजीराव पहिला यांच्या मृत्युनंतर त्यांनी पेशवा हे पद स्वीकारले.
सार्क ORGANISATION
१९७०च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क South Asian Association for Regional Cooperation संघटना उभारण्यात आली. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (SAARC) ही दक्षिण आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे.
आजतागायत संघटनेच्या १८ शिखर परिषदा पार पडल्या आहेत. सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असते अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे.
स्थापना
८ डिसेंबर १९८५
मुख्यालय
काठमांडू, नेपाळ
सदस्यत्व
८ सदस्य
९ निरिक्षक
अधिकृत भाषा
इंग्लिश
सरचिटणीस
अर्जुन बहादुर थापा
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇